महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणार्‍या नवजा येथील धबधब्याला पर्यटकांची गर्दी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आठशे फुटांनवरून कोसळणारा सातारा जिल्हयातील कोयनानगर नवजा येथील ओझर्डे धबधबा सध्या पर्यटकांना खुणवत आहे. संततधार पाऊसाने कोयना परिसरात पाऊसाळी पर्यटकांची मांदीयाळी सुरु झाली असुन दररोज शेकडो पर्यटक ओझर्डे धबधब्याला भेट देत आहेत. कोयनेच्या धुवाधार पाऊस व कोयना धरण दर्शनासह अनेक निर्सगरम्य ठिकाणांचा पर्यटक सुरक्षितपणे आनंद घेत असुन कोयनेत वर्षा सहलींना उधाण आले आहे.

राज्यात सर्वाधिक पाऊस पडणारे व महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाणारे सातारा जिल्हयातील कोयनानगर नवजा येथील आठशे फुटावरुन ऊतुंगपणे कोसळणारा ओझर्डे धबधबा पर्यटकांना पाऊसाळी सहलीसाठी खुणवत असुन कोयना अभयारण्यातील सहृयाद्री व्याघ्र प्रकल्पात असणाऱा ओझर्डे धबधबा हा एक जुलै पासुन वनविभागाकडुन पर्यटकांना पाहण्यासाठी खुला झाला आहे. धबधब्याला दररोज शेकडो पर्यटक भेट देत आहेत. ही संख्या दिवसेदिवस वाढत असुन ओझर्डे धबधब्यासह याठिकाणी अनेक छोटे छोटे धबधबे असुन कोयनानगरचा धुवाधार पाऊस व कोयना धरण दर्शनासह अनेक निर्सगरम्य ठिकाणांचा पर्यटक सुरक्षितपणे आनंद घेता आहेत. कोयनानगर पोलिसांनी पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी अनेक उपाय योजना केल्या असुन याठिकाणी पर्यटक सहकुढुंब सहलीचा आनंद घेऊ शकतात. हुल्लडबाज तसेच अनेक नशाबाज पर्यटकांवर कारवाई केली आहे. नाकाबंदी करुन वाहन तपासणीसह योग्य पार्किंग व हुल्लडबाजांवर लक्ष ठेवले जाते.

ओझर्डे हा धबधबा वनखात्याच्या ताब्यात असुन या परिसरात वन औषधींची जोपासना केली जाते धबधबा पाहण्यास शुल्क असुन येथे खाली पासुन टोका पर्यत वनकर्मचारी तैनात असतात पुणे मुंबई सह पशिचीम महाराष्ट्रातील पर्यटकांचा येथे दररोज ओघ वाढत असुन येथे पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते वनखात्यामार्फेत येथील नियोजन केले जाते.

कोयनानगर येथे पावसातील सहलीचा पर्यटक सह कुठुंब आनंद लुटत असुन पर्यटक ओझर्डे धबधबा व कोयना परिसर येथील धुवांधार पाऊस अप्रतिम असल्याचे सांगुन कोयना हे ठिकाण सहपरिवार येण्यास सुरक्षित ठिकाण असुन वनखात्यासह पोलिस बंदोबस्त योग्य असल्याच्या प्रतिक्रिया पर्यटकांनी दिल्या आहेत.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसाची संततधार सुरु असुन महाराष्ट्रातील चेरापुंजी समजली जाणाऱ्या नवजा येथे रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. सकाळी पाच वाजेपर्यत 321 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाच्या पाणीसाठय़ात 24 तासात ६ टीएमसी ने वाढ असुन कोयना धरणात २४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

Leave a Comment