Navi Mumbai Airport : मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी! आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) मे महिन्यात कार्यान्वित होणार असल्याची माहिती आहे.एअरपोर्ट अथॉरिटीच्या माहितीनुसार 17 एप्रिल 2025 रोजी याचे उद्घाटन होणार आहे. सुरुवातीला T1 टर्मिनल आणि एकच रनवे कार्यरत असेल, आणि नंतर इतर सुविधांचा टप्प्याटप्प्याने विस्तार (Navi Mumbai Airport ) केला जाईल.
गेल्या 70 वर्षांत मुंबईची लोकसंख्या 10 पट वाढली, पण विमानतळ एकच राहिले . आता नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यावर, मुंबई विमानतळाच्या T1 आणि T2 टर्मिनलवरून काही फ्लाइट नवीन विमानतळावर हलवल्या जातील. त्यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हायला मदत होणार आहे.
कधी सुरू होणार व्यावसायिक उड्डाणे ? (Navi Mumbai Airport )
नवीन विमानतळ रायगड जिल्ह्यातील उलवे येथे बांधले गेले आहे. मे अखेरीस व्यावसायिक उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या शेवटी उड्डाणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विमान कंपन्यांना ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 या हिवाळी वेळापत्रकानुसार योजना तयार करण्यास सांगण्यात आले आहे.
20-30 लाख प्रवाशांचा अंदाज (Navi Mumbai Airport )
सुरुवातीच्या काही महिन्यांत NMIA वरून 20-30 लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे. ATF हे विमानांसाठी आवश्यक असलेले इंधन आहे. राज्य सरकारकडे विमान इंधन (ATF) वरील VAT 18% वरून 1% करण्याची (Navi Mumbai Airport ) मागणी करण्यात आली आहे.
किती प्रवासी नवीन विमानतळावर जातील? (Navi Mumbai Airport )
2024 मध्ये मुंबई विमानतळाने 5.5 कोटी प्रवाशांना सेवा दिली. मे 2025 नंतर अंदाजे 1.1 कोटी प्रवासी नवी मुंबई विमानतळावर जातील. मुंबई विमानतळाचे T1 टर्मिनल ऑक्टोबर 2025 ते 2029 पर्यंत बंद राहील. 2029 पर्यंत मुंबई विमानतळाची क्षमता 1.5 कोटींवरून 2 कोटी प्रवासी करण्याचा मानस आहे. सध्या T1 टर्मिनलवरून 1.5 कोटी प्रवासी प्रवास करतात. यातील 1 कोटी प्रवासी ऑक्टोबर 2025 पासून NMIA कडे वळतील. उर्वरित 50 लाख प्रवासी मुंबईच्या T2 टर्मिनलवर शिफ्ट केले जातील.
टर्मिनल्सचा विस्तार
मुंबई T2 ची क्षमता 4 कोटींवरून 4.5 कोटी प्रवाशांपर्यंत वाढवली जाईल.नवी मुंबई T1 2026 च्या मध्यापर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल. हा नवीन विमानतळ पूर्ण क्षमतेने चालू होण्याचा जगातील सर्वात वेगवान विक्रम ठरू शकतो. 2029 पर्यंत नवी मुंबईत T2 टर्मिनल देखील पूर्ण होईल. नवी मुंबई विमानतळ भविष्यातील हवाई वाहतुकीसाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल. यामुळे मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मिळून प्रवाशांची वाढती संख्या व्यवस्थित हाताळली जाईल. 2029 पर्यंत दोन्ही विमानतळांच्या टर्मिनल्सचा विस्तार होईल. यामुळे (Navi Mumbai Airport ) आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास अधिक सोपा आणि वेगवान होईल.