Navi Mumbai Airport : मोठी बातमी!! नवी मुंबई विमानतळ ‘या’ तारखेला सुरु होणार

Navi Mumbai Airport
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Navi Mumbai Airport। बहुप्रतीक्षित नवी मुंबई विमानतळाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. नवी मुंबई विमानतळाचे ९५ टक्के काम पूर्ण होत आलं असून सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हे विमानतळ कार्यान्वित होईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली आहे. खरं तर मुंबईवरचा प्रवासी ताण कमी करण्यासाठी नवी मुंबईत विमानतळ बांधण्याचं काम सुरु आहे. हे विमानतळ कधी सुरु होणार याबाबत प्रवाशांना उत्सुकता होती. अखेर उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे नवी मुंबई विमानतळ हे देशातील दुसरे सर्वात मोठं विमानतळ असणार आहे.

सध्या महाराष्ट्र राज्य पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात सरकारला नवी मुंबई विमानतळाबाबत (Navi Mumbai Airport) प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं कि, सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत नवी मुंबईचे विमानतळ कार्यान्वित होईल. यापूर्वी विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांनीदेखील या विमानतळाबाबत प्रतिक्रिया दिली होती. 25 जून रोजी राहुल कुल, मिलिंद नार्वेकर यांच्यासह काही आमदारांनी नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली होती. त्यावेळी बोलताना राहुल कुल म्हणाले होते की सप्टेंबरमध्ये विमानतळाचे काम पूर्ण होईल. नवी मुंबई विमानतळाच्या नावा संदर्भातील अंतिम निर्णय मात्र शासन स्तरावर होईल असेही त्यांनी म्हंटल होते.

कसं असेल नवी मुंबई विमानतळ ? Navi Mumbai Airport

नवी मुंबई विमानतळ (Navi Mumbai Airport) हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ असेल. या विमानतळाचा रनवे 3.7 किमी इतका लांबीचा असून एकाचवेळी 350 विमाने उभे राहू शकतील इतकी या विमानतळाची क्षमता आहे. नवी मुंबई विमानतळ थेट मेट्रोने जोडले जाणार आहे.हे विमानतळ पूर्णपणे कार्यन्वित झाल्यानंतर वर्षाला 9 कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करु शकतात. या विमानतळाचा पहिला टप्पा एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर 2029 पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर, तिसरा टप्पा 2032 पर्यंत आणि चौथा टप्पा 2036 पर्यंत पूर्ण होईल, असं बोललं जातंय. महत्वाची बाब म्हणजे नवी मुंबई विमानतळामुळं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार आहे.