हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल अनेक चर्चा चालू झालेल्या आहेत. परंतु आता या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम शेवटच्या टप्प्यात आलेले, असून 29 डिसेंबर 2024 रोजी पहिल्या व्यवसायिक विमानाचे लँडिंग देखील यशस्वीरित्या झालेले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर वायू दलाचे 295 आणि सुखोई 30 या विमानांचे यशस्वी लँडिंग झाले होते.
हाती आलेल्या माहितीनुसार नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम हे येत्या 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. आणि त्यानंतर विमानतळ चालू होणार आहे. या विमानातून एका वर्षाला जवळपास 9 कोटींपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतील असे सांगण्यात आलेले आहे. हे विमानतळ सुमारे 5945 एकर जागेवर उभारण्यात आलेले आहे. या विमानतळाचा रनवे 3. 7 किलोमीटर इतका असून एकाच वेळी 350 विमाने या ठिकाणी उभे राहू शकतात. हे विमानतळ 17 एप्रिल 2025 पासून चालू होऊ शकते, अशी ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
नवी मुंबईतील या विमानतळाचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे. विमानतळाचा रनवे, सिग्नल यंत्रणा यांसारखी महत्त्वाची कामे देखील पूर्ण झालेली आहेत. महिन्याभरापूर्वी लष्कराच्या विमानाचे यशस्वी लँडिंग या ठिकाणी करण्यात आलेले होते. यावेळी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी व्यावसायिक देखील विमानात उपस्थित होते. त्या विमानाचे यशस्वी लँडिंग झाल्याने सगळ्यांना आनंद झाला होता.