हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक अथक परिश्रमानंतर नवी मुंबईकरांना मेट्रो (Navi Mumbai Metro) मिळाली. मेट्रोमुळे शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीला काही प्रमाणात आळा बसला आहे. मुंबई प्रमाणेच नवी मुंबईकराना सुद्धा मेट्रोची भुरळ पडली असून अनेकजण आता मेट्रो प्रवासाला आपलं प्राधान्य देत आहेत. त्यातच आता मेट्रोकडून मोठी अपडेट आली आहे. ती म्हणजे नवी मुंबईत मागील ५ दिवसात तब्बल 68,000 हुन अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे.
चला त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
उत्सव चौक ते तळोजा मार्गवरील वाहतूक झाली कमी
मुंबईतील ट्राफिकचा हॉटस्पॉट म्हणजे उत्सव चौक ते तळोजा मार्ग. या मार्गावर रोज प्रचंड ट्राफिक असते. मात्र मेट्रो (Navi Mumbai Metro) सुरु झाल्यामुळे या मार्गांवरील गाड्यांची संख्या कमी झाली आहे असे वाहतूक विभागाने दिलेल्या अहवालात सांगितले आहे. तसेच याचा प्रभाव हा सायन-पनवेल महामार्गालगत असलेल्या हिरानंदानी चौकात दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचत आहे. असे म्हणायला हरकत नाही.
सिडकोने दिली प्रवाश्यांची आकडेवारी- Navi Mumbai Metro
सिडकोने दिलेल्या आकडेवारीनुसार मेट्रो सुरु झाल्याच्या पहिल्या पाच दिवसात मेट्रोने (Navi Mumbai Metro) प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या ही तब्बल 68,000 हजार एवढी होती. तर सुट्ट्याच्या काळात 15,000 लोकांनी मेट्रोची निवड केली. तसेच आरबीआय स्टेशन सोडले तर बहुतेक स्थानकांवर दररोज 500 हून अधिक प्रवाशांची वर्दळ होती. त्यामुळे मेट्रोला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. म्हणून नवी मुंबई मेट्रोच्या पहिल्या मार्गिकेचे म्हणजेच पेंढार ते बेलापूर मार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर आता प्रवासी प्रस्तावित मेट्रो मार्ग 2, 3 आणि 4 च्या भवितव्याचा विचार करत असल्याचे वाहतूक विभागातील एक अधिकाऱ्यानी सांगितले.
मेट्रोचे भाडे बसपेक्षा आहे जास्त
मेट्रोन प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना मेट्रो चांगली पसंतीस पडत आहे. मात्र याच्या भाड्याबद्दल बोलताना काहीजण म्हणतात की, मेट्रोचे तिकीट हे बसपेक्षा अधिक आहे. म्हणजे बेलापूर ते पेंढार या मेट्रो प्रवासासाठी 40 रुपये तिकीट आहे. तर त्याच मार्गावरील एसी बसेससाठी 27 रुपये आणि नॉन-एसी बससाठी 21 रुपये आकारले जातात. त्यामुळे काही प्रवाश्यांनी मेट्रोच्या भाड्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.