अश्लील छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मयूर मोहिते हा २५ वर्षीय तरुण पनवेलच्या वावंजे परिसरात राहत होता. तेव्हा त्याची ओळख १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत झाली होती. याचा फायदा उचलत त्याने त्या अल्पवयीन मुलीसोबत व्हॉट्सअ‍ॅप कॉलच्या माध्यमातून तिची नग्न छायाचित्रे काढून ती सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच तिच्या वडिलांना दाखवून तिची बदनामी करण्याची धमकी दिली. या प्रकरणी त्या तरुणीने तक्रार दिली असता पनवेल तालुका पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून मयूरला अटक केली आहे.

काय आहे प्रकार
मागच्या महिन्यात मयूरने ओळखीचा फायदा घेत पीडित मुलीला व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल करून तिला जबरदस्तीने कपडे काढण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने तिची नग्न छायाचित्रे व व्हिडीओ काढून घेतले. यानंतर त्याने तिच्याबरोबर व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करून तिची अश्लील छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केल्यास त्यातून चांगले पैसे मिळतील असे सांगून तिला तशी छायाचित्रे काढण्यास सांगितले. मात्र त्या मुलीने हे करण्यास नकार दिला. तसेच त्या मुलासोबत बोलणेदेखील बंद केले.

यानंतर मयूरने त्याच्याकडील तिची नग्नावस्थेतील छायाचित्रे व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच तिच्या वडिलांना ते दाखवून तिची बदनामी करण्याची धमकी दिली. यानंतर त्या मुलीने घडलेला सगळं प्रकार आपल्या आईला सांगितला त्यानंतर तिच्या आईने पनवेल तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Leave a Comment