राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा याना कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वांद्रे कोर्टाने याबाबत निकाल दिला. पोलिसांनी राणा दाम्पत्याची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र कोर्टाने न्यायालयीन कोठडीची शिक्षा दिल्यामुळे राणा दाम्पत्यासाठी जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे

राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी काल भडकावं व्यक्तव्य केल्याच्या आरोपाखाली 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आज वांद्रे कोर्टात त्यावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायाधीश ए. ए. घनीवाले यांनी राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता रवी राणा यांची आर्थर रोड कारागृहात तर नवनीत राणा यांची भायखळा कारागृहात रवानगी होणार आहे.

सरकार विरोधी वक्तव्य केल्यामुळे राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अपशब्द वापरुन त्यांना आव्हान दिले. त्यांनी नोटिशीला न जुमानता त्यांनी शासनाला आव्हान दिलं. त्यामुळं त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला, त्यामुळं त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सरकारी वकील घरत यांनी सांगितलं.

राणा दाम्पत्याने थेट मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले होते. त्यानंतर मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. एकूण सर्व परिस्थिती पाहून राणा दाम्पत्याने माघार घेत आपण मातोश्रीवर जाणार नाही अशी घोषणा केली. मात्र त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत कलम 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून राणा दाम्पत्याला अटक करत रात्रभर सांताक्रुझ पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलं. त्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर केलं गेलं

Leave a Comment