हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. नवनीत राणा हे कट्टर हिंदुत्व वादासाठी ओळखल्या जातात. यापूर्वी त्यांची अनेक भाषणे आणि वक्तव्ये चर्चेत आली होती, आता त्यांनी थेट हैद्राबादला जाऊन ओवैसी बंधूना खुलं आव्हान दिले आहे. 2012 मध्ये अकबरुद्दीन ओवैसीने (Akbaruddin Owaisi) म्हंटल होत कि 15 मिनिटासाठी पोलिसांना हटवा, मग आम्ही दाखवून देऊ, कोणात किती दम आहे. त्यावर उत्तर देताना नवनीत राणा यांनी ओवैसीना अवघ्या १५ सेकंदाचे आव्हान दिले आहे. 15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवलं, ते कुठून आले आणि कुठे गेले कळणार पण नाही असं नवनीत राणा यांनी म्हंटल.
भाजपाने हैदराबादमधून असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात माधवी लता यांना तिकीट दिलं आहे. त्यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा हैदराबादमध्ये गेल्या होत्या, त्यावेळी आपल्या भाषणात नवनीत राणा म्हणाल्या, छोट्याला माझं एवढच सांगणं आहे की, तुला 15 मिनिट लागतील, पण आम्हाला 15 सेकंद पुरेसे आहेत. 15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवलं, तर छोटा (अकबरुद्दीन ओवैसी) आणि मोठा (असदुद्दीन ओवैसी) यांना समजणारच नाही की, ते कुठून आले आणि कुठे गेले” असं नवनीत राणा म्हणाल्या.
15 सेकंद लगेगा @AkbarOwaisi_MIM @asadowaisi pic.twitter.com/TfEmWhvArX
— Navnit Ravi Rana (Modi Ka Parivar) (@navneetravirana) May 8, 2024
नवनीत राणा पुढे म्हणाल्या, हैदराबादला पाकिस्तान बनण्यापासून रोखण्यासाठी ही लोकसभेची निवडणूक आहे. त्यामुळे यंदा हैदराबादमध्ये मतदान होणार आहे ते फक्त देश हितासाठी होईल. त्यामुळे हैदराबादला पाकिस्तान बनण्यापासून रोखण्यासाठी मतदान करा… आमची वाघिण माधवी लता यांना देशाच्या संसदेत पाठवण्यासाठी यावेळी मतदान करायचं आहे. हैदराबादमध्ये सगळ्या हिंदुंना जाग करण्यासाठी मतदान करायचं आहे” असं नवनीत राणा यांनी आपल्या भाषणात म्हंटल.
दरम्यान, एआयएमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी नवनीत यांच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला आहे. भाजप नेते निवडणुकीदरम्यान अशी विधाने करत आहेत, जे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करतात. नवनीत राणा यांच्या या वक्तव्यावर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी. कारण अशी वक्तव्ये दिल्याने दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते असं वारीस पठाण यांनी म्हंटल. दररोज मुस्लिमांविरोधात अशी वक्तव्ये केली जातात आणि भाजप नेत्यांना मुस्लिमांविरोधात वक्तव्य करण्यात मजा येते. मात्र कोणावरही कारवाई होत नाही. राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत, मग हे सर्वांचे अधिकार आहेत का? असा सवालही त्यांनी केला.