“टेस्ट जरी भाजपची असली तरी बेबी तुमच्याच नावाची आहे”; नवनीत राणा यांचा राऊतांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पेनड्राईव्ह प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर आज आरोप केला. तसेच त्यांना “नुसतं बोंबलून चालतं का? रोज एक पेनड्राईव्ह बाळंत होतोय. रोज काढतायत, पेनड्राईव्हची काही टेस्ट ट्यूब बेबी काढली आहे का?” असा खोचक सवाल राऊतांनी केला. त्यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राऊतांना टोला लगावला आहे. “टेस्ट जरी भाजपची असली तरी बेबी तुमच्याच नावाची आहे. त्यामुळे पेन ड्राईव्हला टेस्ट ट्यूब बेबीचे नाव दिले जात आहे, असे राणा यांनी म्हंटले.

नवनीत राणा यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना भाजपवर टीका आलेली आहे. त्यांनी पेन ड्राइव्ह टेस्ट ट्यूब बेबी आहे का ?असा सवाल केला आहे. याबाबत सांगायचे झाले तर महाराष्ट्र राज्यात सुडाचे राजकारण चालू आहे.

यावेळी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांनी घरे देण्याच्या घेतलेल्या निर्णयावरही प्रतिक्रिया दिली. “आमदारांना घर आहेत, मात्र गोरगरिबांना महाराष्ट्रात घर नाहीत, त्यांचा विचार राज्य सरकारने करावा, मनोरा आमदार निवासबाबत राज्य सरकारने विचार करावा, आदर्श घोटाळा प्रमाणे मनोरा आमदार निवास घोटाळा आहे, असेही राणा यांनी म्हंटले.

Leave a Comment