व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

…. तर आम्हाला फाशी द्या; कोठडीच्या शिक्षेनंतर नवणीत राणांचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना वांद्रे कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे .या प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी ही येत्या २९ तारखेला होणार आहे.. या शिक्षेनंतर नवनीत राणा यांनी ट्विट करत जर हनुमान चालीसा पाठ करणं पाप असेल तर आम्हाला फाशी द्या असं म्हंटल आहे.

हनुमान चालीसा वाचणे पाप आहे का? असा सवाल नवनीत राणा यांनी केला आहे. कलम १२४ (अ) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा लावा. देशातील जनतेला आमचा प्रश्न आहे की हनुमान चालीसा पाठ करणे गुन्हा आहे. असेल तर आम्हाला फाशी द्या.. असे ट्विट नवनीत राणा यांनी केलं आहे.

राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल
दरम्यान, वांद्रे कोर्टाने राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे तसेच सरकार विरोधी वक्तव्य केल्यामुळे राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अपशब्द वापरुन त्यांना आव्हान दिले. त्यांनी नोटिशीला न जुमानता त्यांनी शासनाला आव्हान दिलं. त्यामुळं त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला, त्यामुळं त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सरकारी वकील घरत यांनी सांगितलं.