नवनीत राणा तुरुंगातून थेट लिलावती रुग्णालयात; नेमकं काय झालं ??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांची आज न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली. मात्र प्रकृती अस्वस्थेमुळे नवनीत राणा याना थेट लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमैय्या हे यावेळी राणा यांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी लीलावती रुग्णालयात उपस्थित होते.

नवनीत राणा यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यापूर्वी तुरुंगात असताना त्यांना मानेचा त्रास सुरू झाला होता. आपल्याला स्पॉन्डॅलिसिसचा त्रास असल्याचं वारंवार सांगूनही अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी यापूर्वी केला होता. आता लीलावती रुग्णालयात त्यांची तपासणी सुरु असून त्यांना आता ऍडमिट करून उपचार करणार कि घरी सोडणार ते लवकरच कळेल

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान राणा दाम्पत्याने दिले होते. त्यानंतर मुंबईत घडोमोडींनि वेग घेतला होता. राणा दाम्पत्यावर विविध कलमांच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्य मागील बारा दिवसांपासून तुरुंगात होतं. त्यांच्यावर राजद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांना बचाव पक्षाचा युक्तीवाद मान्य झाला. त्यानंतर त्यांनी विविध अटींसह राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे.

Leave a Comment