Navratri 2024 | सध्या महाराष्ट्रात अनेक सण उत्सव चालू झालेले आहे. गणपती संपल्यानंतर मग आता सर्वत्र नवरात्रीचे धामधूम चालू झालेली आहे. हिंदू कॅलेंडरनुसार आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी पासून नवरात्री या सणाला सुरुवात होते. त्यामुळे यावर्षी ही शारदीय नवरात्र गुरुवारी म्हणजेच 3 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार आहे. हिंदू धर्मानुसार नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. यावेळी तिच्या जागर केला जातो.
हिंदू पुराणानुसार असे मानले जाते की, नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दुर्गामाता ही पृथ्वीवर निवास करत असते. आणि तिच्या भक्तांचे रक्षण करत असते. त्यामुळे नवरात्रीचे हे नऊ दिवस खूप पवित्र असतात. अनेक लोक या नऊ दिवसांमध्ये कडक उपवास करतात. असे म्हणतात की, दुर्गा माता पृथ्वीवर असल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण करत असते. परंतु जरी तुम्हाला उपवास करणे, शक्य नसेल तर या नऊ दिवसांमध्ये काही गोष्टी करणे टाळा. तसेच कोणत्या गोष्टी केल्याने काही गोष्टी केल्याने नवरात्रीच्या उपासनेचे तुम्हाला फळ मिळते. हे आज आपण जाणून घेऊया.
नवरात्र कधीपासून सुरू होत आहे ? | Navratri 2024
पंचांगानुसार दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा या तिथीला नवरात्रीला सुरुवात होते. यावर्षीही तिथे 3 ऑक्टोबर रोजी येत आहे. ही तिथी 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 12:19 पासून सुरु होईल. तर दुसऱ्या दिवशी 4 ऑक्टोबर रोजी पहाटे 2 वाजून 58 पर्यंत समाप्त होईल. 3 तारखेला सुरू झालेला, हा उत्सव शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी संपणार आहे.
नवरात्रीत कोणत्या गोष्टी करायला पाहिजे.
- दुर्गा मातेला लाल रंग खूप आवडतो. त्यामुळे तुम्ही या नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीला लाल रंगाची फुले अर्पण करू शकतात. तसेच लाल रंगाचे कपडे देखील अर्पण करू शकता. लाल रंग हा समृद्धी नशीब आणि शक्ती तसेच प्रेमाचे प्रतीक मानले जाते.
- नवरात्रीच्या दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करा आणि दुर्गा मातेला दररोज नवीन फुले फळे आणि मिठाई अर्पण करा.
- नवरात्रीमध्ये तुम्ही दुर्गादेवीच्या मंत्राचा जप करू शकता. आणि ध्यान देखील करू शकता यामुळे तुमची मनशांती वाढेल एकाग्रता वाढते आणि तुमचे कुटुंब आनंदात राहते.
- ज्या दिवसांमध्ये तुम्ही गरजूंना दान देऊ शकता. तसेच सेवा करू शकता. हे एक महत्त्वपूर्ण कृत्य मानले जाते. असे केल्यास तुम्हाला चांगले फळ मिळते.
शारदीय नवरात्रात या गोष्टी करू नये | Navratri 2024
- नवरात्रीच्या या दिवसांमध्ये अखंड ज्योत पेटवणे खूप चांगले मानले जाते. जर तुम्ही अखंड ज्योत लावत असाल, तर घर कधीही रिकामी ठेवू नका. अखंड ज्योत विजू देऊ नका.
- नवरात्रीच्या या दिवसांमध्ये तुम्ही तामसिक अन्न तसेच मद्याचे सेवन करू नका.
- या दिवसांमध्ये तुम्ही नकारात्मकते पासून दूर राहा आणि चांगले विचारांचा स्वीकार करा. कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका भांडण करू नका.
- नवरात्रीची पूजा करताना शिस्त खूप महत्त्वाची आहे. नवरात्रीच्या काळात तुम्ही वेळेवर उठणे देवीची भक्ती भावाने पूजा करणे खूप गरजेचे आहे. असे केल्याने तुम्हाला नक्कीच देवीचा आशीर्वाद लाभेल.