भाजपमध्ये दारू पिणारे असंख्य लोक, पिल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही; मलिकांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक याच्यावर हल्लाबोल केला. फडणवीसांच्या टीकेला मलिकांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ठाकरे सरकारने शेतकऱ्याच्या हितासाठी वाईनबाबत निर्णय घेतला. यावरून भाजप मधील लोकांकडून वारंवार टीका केली जात आहे. मी विचारतो कि तुम्ही तुमच्या वायनरी बंद करणार का? भाजपमध्ये असंख्य लोक हे दारू पिणारे आहेत. ती पिल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही, असे मलिक म्हणाले.

नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपकडून वाईनच्या निर्णयाबाबत वारंवार बोलले जात आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र होऊन देणार नाही. मात्र, भाजपमध्येच असंख्य लोक हे दारू पिणारे आहेत. ती पिल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. जे काही बेवडा बेवडा हे शब्द वापरत आहेत. ते रात्री कुठे बसतात हे आम्हालाही चांगले माहिती आहे, असे मलिक यांनी म्हंटले.

अमृता फडणवीसांच्या ट्विटमध्ये अत्यंत घाणेरडे शब्द वापरण्यात आले आहेत. त्याच्या या ट्विटबाबत मला काही बोलायचे नाही. असेही यावेळी मलिक यांनी सांगितले. काल अमृता फडणवीसांनी ट्विट करीत “संजय राऊत, नवाब मलिक आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. फडणवीसांनी या तिन्ही नेत्यांचा उल्लेख नामर्द, बिगड़े नवाब आणि नन्हें पटोले, असा केला आहे.