नवाब मलिक यांनीच दंगल घडवून आणली; भाजप नेत्याचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | त्रिपुरा येथील मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असून ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. त्यातच अमरावती येथील मोर्चाला हिंसक वळण मिळाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीच ही दंगल घडवून आणली असा खळबळजनक आरोप भाजप नेते हाजी अराफत यांनी केला आहे.

अमरावतीमधील दंगलीमागे नवाब मलिक यांचा हात असल्याचा आरोप हाजी अराफात यांनी केला आहे. मुंबईतून अमरावतीमध्ये पैसे पोहोचवण्याचं काम नवाब मलिकांनी केलं असल्याचाही आरोप हाजी अराफत शेख यांनी केला आहे. नवाब मलिकांचे रझा अकादमीचे प्रमुख सईद नुरीसोबत जूने संबंध असून त्यांनीच ही दंगल घडवून आणली असा आरोप हाजी अराफत यांनी केला.

जेव्हा जेव्हा एनसीपीचं सरकार आलं सईद नुरी बिळातून बाहेर येतो, भिवंडी, आझाद मैदान सगळ्या दंगलीत यांचंच नाव येतं. नवाब मलिकांकडे ठोस पुरावे आहेत का की हे भाजपचं काम आहे, असा सवाल हाजी अराफत यांनी केला आहे.

You might also like