व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

समीर वानखेडेच्या वडिलांचे नाव दाऊद?? मलिकांनी दिला अजून एक पुरावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि ncb अधिकारी समीर वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचा दावा केला होता. मात्र, समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी हा दावा फेटाळून लावला होता. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी आणखी एक छायाचित्र ट्विट केल्याने वानखेडे आता चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका फसबुकचा प्रोफाईल पिक्चर शेअर केला आहे. यामध्ये समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांचे छायाचित्र दिसत आहे. मात्र, या प्रोफाईलवर वानखेडे दाऊद असे नाव लिहले आहे. त्यामुळे ज्ञानदेव वानखेडे की दाऊद वानखेडे या संभ्रमात आणखीनच भार पडली आहे.

तत्पूर्वी ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांच्या सर्व आरोपांचे खंडन केले होते. माझं नाव दाऊद पहिल्यापासूनही कधी नव्हतं. आताही नाही. जन्मल्यापासून माझं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे आहे. शाळेत जाण्यापासून, कॉलेजला जाण्यापासून, एलएलबीला प्रवेश घेण्यापासून, डिपार्टमेंटला जाण्यापासून, रिटायर होण्यापासून माझं नाव ज्ञानदेव वानखेडे आहे. हे कुणीतरी गैरवापर करुन किंवा बनावट केलं असेल, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही किंवा माहितीही नाही, असे स्पष्टीकरण समीर वानखेडे यांच्या वडिलांनी दिले होते.

लवकरच स्पेशल 26 दाखवणार – मलिक

दरम्यान नवाब मलिक यांनी आज सकाळी एक ट्वीट केलं असून यामुळे आता कोणते नवे आरोप आणि खुलासे होत आहेत याची चर्चा सुरु झाली आहे. SPECIAL 26 असं ट्वीट करत नवाब मलिक यांनी आपण लवकरच रिलीज करतोय असं म्हटलं आहे. त्यामुळे हे ‘स्पेशल २६’ म्हणजे नेमकं काय आहे पहावं लागणार आहे. नवाब मलिक यांनी यावेळी एका अज्ञात एनसीबी अधिकाऱ्याने पत्र पाठवलं असून त्यातील माहिती समोर आणणार असल्याचंही सांगितलं आहे.