नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली; जे. जे. रुग्णालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्तीकडून जमीन व्यवहार केल्याच्या आरोपावरून ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची तब्बेत बिघडली आहे. नवाब मलिक यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, खर तर नवाब मलिक यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आणले. मात्र, आता नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार, मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवत असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने नवाब मलिक यांना 3 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. दाऊद कनेक्शनप्रकरणी सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, नवाब मलिक हे चौकशीदरम्यान सहकार्य करत नसल्याचा माहिती ईडीच्या गोटातून बाहेर आली आहे.