राष्ट्रवादीला अजून एक धक्का!! ; ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांच्या जावयाला समन्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावलं आहे. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यामुळं गदारोळ उठला असतानाच मलिक यांच्या जावयाला समन्स आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता वाढली आहे.

समीर हे नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे पती आहेत. समीर खान आणि करण संजानी यांच्यात ‘गुगल पे’च्या माध्यमातून २० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. ड्रग्ज पुरवण्याच्या बदल्यात हा व्यवहार झाला आहे, असा संशय एनसीबीला आहे. याच संदर्भात चौकशीसाठी समीर खान यांना बोलावण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे झालेले आरोप ताजे असतानाच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एकापाठोपाठ एक अशा दोन प्रकरणात अडकल्याने राष्ट्रवादीवर राजकीय संक्रात ओढावल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडेच राज्याचे गृहखाते असल्याने या दोन्ही प्रकरणात राष्ट्रवादी काय कारवाई करते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like