व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

“भाजप नेत्यांचे अभिनेत्रींशी संबंध, त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही”; नवाब मलिकांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकार तसेच शिवसेना पक्षावर वारंवार अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. दरम्यान या आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप नेत्यांचा कोणत्या अभिनेत्रींशी संबंध आहे हे सांगायला लावू नका, आमच्याकडे यादी आहे. ती यादी समोर आल्यानंतर भाजप नेत्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही”, असे म्हणून मलिकांनी इशारा दिला आहे.

नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात आणि देशात सध्या भाजपकडून घाणेरडं राजकारण सुरू आहे. वारंवार अनेक राजकारण केले जात आहे. उध्या जर काही वाईट घडलं तर त्याची जबाबदारी भाजपची राहिल.

एखादी महिला मृत्युमुखी पडल्यानंतर तिच्या नावावर अनेक आरोप करत आहेत. भाजपच्या लोकांकडून अभिनेता सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूसंबंधी अनेक गोष्टी बोलून घाणेरडे राजकारण केले जात आहे. आम्हालाही भाजप नेत्याचे कोणाशी काय संबंध आहेत हे आम्हालाही चांगलेच माहीत आहे, असेही मलिक यांनी म्हंटले.