एक कोटीच बक्षिस असणारा जहाल नक्षलवादी पोलिसांना शरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायपूर (छत्तीसगड) | महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांचे एकत्रित एक कोटी बक्षीस असणारा नक्षलवादी छत्तीसगड पोलिसांना शरण आला आहे. पहाडसिंग उर्फ अशोक उर्फ टिपू सुलतान असे त्या नक्षलवाद्यांचे नाव आहे. पहाड सिंग ची पत्नी छत्तीसगड मधील एका गावाची सरपंच होती. सरपंच असतांना २००३ साली पहाड सिंगच्या मित्रांनी च त्याच्या बायकोवर अविश्वास ठराव आणला आणि ठराव संमत झाला. मित्रांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने पहाड सिंग नक्षली चळवळीत समाविष्ट झाला.
अल्पावधीतच पहाड सिंग पेशेवर नक्षलवादी झाला आणि त्याच्या सफाईदार कामगिरीवर खुश होऊन त्याला वरच्या पदावर बढती देण्यात आली. सध्या तो एका विभागाचा सचिव म्हणून काम बघत होता. छत्तीसगड पोलिसांसमोर पहाड सिंगने आत्मसमर्पण केले आहे. त्याच्या आत्मसमर्पणासाठी २०१३ पासून प्रयत्न करण्यात येत होते.

Leave a Comment