नक्षली हल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांना राजीनामा मागणे चुकीचे : रामदास आठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |नक्षलवादी हल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांना राजीनामा मागणे चुकीचे आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीत विरोधांनी राज्य शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले . त्यांच प्रमाणे या हल्ल्याचे राजकारण नाही केले पाहिजे असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

नक्षलवादी हल्ले कोणतेही सरकार असले तरी होतच असतात त्यामुळे आपण अशावेळी सरकारवर टीका नकरता सरकारच्या पाठीशी उभा राहिले पाहिजे. कारण आपणच जर नक्षलवाद्यांना आपल्यात फूट आहे हे दाखवले तर आपण त्यांच्या कार्याला उत्तेजन दिल्या सारखे होईल असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

गडचिरोली जिल्हयात जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंग लावून नक्षलवाद्यांनी पोलिसांची गाडी उडवून दिली आहे. या स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले आहेत. तर हा हल्ला महाराष्ट्र दिनीच घडल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. शरद पवार यांनी तर मुख्यमंत्र्यांना जनाची नाही मनाची लाज असेल तर ते राजीनामा देतील असे वक्तव्य केले आहे. तर अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री पदाचा तरी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे.

Leave a Comment