परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शासन व प्रशासन कसोटीचे प्रयत्न करत आहे .त्यात राज्यात दोन हजार कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत .त्यामुळे आरोग्य विभागावर ताण आलाय .कोरोना विषाणू संसर्ग व प्रादुर्भाव थांबवण्यासाठी लॉक डाऊन असल्याने सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यात राज्य शासनाच्या तिजोरीवरही ताण पडणार आहे .या लढ्यामध्ये घरी बसून लढत असताना दानशूर व्यक्तीनी पुढे येत मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहनही केले आहे . त्यात अशा संकटाच्या वेळी मदतीचे हातही पुढे येत आहेत. आज परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यामध्ये माजी नायब तहसीलदार यांच्या पुढाकाराने सुमारे ५० हजार रुपयांचा मदतनिधी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करण्यात आलाय.
सोनपेठ तालुक्यातील दिघोळ येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार सिद्धलिंग आप्पा मोडीवाले यांनी कोरोना ग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये सदरील रक्कम येथील तुळजाभवानी अर्बन बँकेतुन आरटीजीएस केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्यांना शक्य होईल त्यांनी देणगी देण्याचे आव्हान केले आहे . या आवाहनाला प्रतिसाद देत व सामाजिक बांधिलकी समजून येथील तहसीलदार डॉ .आशिष बिराजदार यांची भेट घेऊन निधी जमा करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे तालुका संघटक रंगनाथ रोडे, सिद्धलिंग आप्पा मोडीवाले ,तुळजाभवानी अर्बन बँकेचे मॅनेजर गणेश निरपणे, भागवत पोपडे व बँकेचे कर्मचारी अनिल भुतकर उपस्थित होते. हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीस दिल्यामुळे सोनपेठ तालुक्यातून सिद्धलिंग आप्पा मोडीवाले यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.