NCA Meeting Pakistan । भारत आणि पाकिस्तान मधील संघर्ष दिवसेंदिवस नवे टोक गाठत आहे. पाकिस्तान रात्रीच्या अंधारात भारतावर एकामागून एक ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करतोय, तर भारतीय लष्कर सुद्धा पाकड्यांचा प्रत्येक डाव हाणून पाडताना दिसतेय. भारताने पाकिस्तानचे ‘फतेह-II हे क्षेपणास्त्र उद्धवस्त करून टाकलं आहे. तसेच पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला यशस्वीपणे परतवून लावला आहे. भारताने पाकिस्तानचे ड्रोन लॉन्चर उद्धवस्त केले आहेत. तसेच इस्लामाबाद आणि रावळपींडी सारख्या शहरांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. भारताच्या पॉवर समोर पाकिस्तान चांगलाच बिथरला असून याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी ‘नॅशनल कमांड अथॉरिटी सोबत तातडीची बैठक घेतली. ‘नॅशनल कमांड अथॉरिटी हि तीच ऍथॉरिटी आहे जिच्याकडे अणुबॉम्ब ची कमांड आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या डोक्यात अणुबॉम्ब टाकण्याचा प्लॅन तर नाही ना? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
आत्तापर्यंतच्या संघर्षात भारतीय सैन्य हे पाकिस्तानवर भारी पडताना दिसले आहे. भारताच्या S-400 डिफेन्स सिस्टीमने कमाल करत पाकिस्तानचे तब्बल ४०० हुन अधिक ड्रोन हल्ले हवेतच हाणून पाडलेत. एकीकडे पाकचा वार डिफेन्स करत असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या महत्वाच्या शहरात हल्ले करून भारताने पाकिस्तानला अक्षरशा जेरीस आणलं आहे. त्यामुळेच पाकिस्तान चवताळला असून त्याच पार्श्वभूमीवर शहाबाज शरीफ यांनी नॅशनल कमांड अथॉरिटी सोबत बैठक (NCA Meeting Pakistan) घेतली. या बैठकीत परमाणु आणि मिसाइल धोरणांवर चर्चा झाल्याचे बोललं जातंय. तसेच भारताच्या ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर देण्यासाठी पाककडून रणनीती आखण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे.
नॅशनल कमांड अथॉरिटी आहे तरी काय? NCA Meeting Pakistan
नॅशनल कमांड अथॉरिटी ही पाकिस्तानची सुरक्षाविषयक बाबींवर निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे. त्याची स्थापना फेब्रुवारी २००० मध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने केली आणि त्याचे मुख्यालय इस्लामाबाद येथे आहे. पाकिस्तानच्या संरक्षण धोरणात आणि प्रादेशिक स्थिरतेत हे प्राधिकरण महत्त्वाची भूमिका बजावते. नॅशनल कमांड अथॉरिटीमध्ये मोठे नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाचे निर्णय नॅशनल कमांड अथॉरिटी घेते. यामध्ये अण्वस्त्र धोरण आणि सुरक्षा योजनांचाही समावेश आहे.




