आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईलचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दि. 1 एप्रिल रोजी शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वकील तुषार खंदारे यांनी दिली. आज शनिवारी सकाळी 11 वाजता प्रभाकर साईलचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाईल.

किरण गोसावीचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रभाकर साईलने माध्यमांसमोर येत ड्रग्ज प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले होते. साईलने मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. तसेच आर्यन खानला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे 25 कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती, असा दावाही साईलने केला होता. साईलने आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत संरक्षणासाठी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव देखील घेतली होती.

तसेच या प्रकरणातील गौप्यस्फोट करताना पुरावे म्हणून साईलने काही फोटो आणि व्हिडीओ देखील सादर केले होते. त्यातील एका व्हिडीओमध्ये आर्यनला अटक करून एनसीबी कार्यालयात आणल्यानंतर किरण गोसावी आर्यन खानजवळ बसून त्याचं फोनवरून कुणाशी तरी बोलणं करून देत असल्याचं दिसत होतं.

Leave a Comment