Thursday, March 23, 2023

सुशांत सिंग राजपूतला ड्रग्ज पोहचवणारे ड्रग पेडलर अटकेत ; NCB ची कारवाई

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासाला अत्यंत वेग आला आहे. नुकत्याच केलेल्या कारवाईत सुशांतपर्यंत ड्रग्ज पोहोचवणारे ड्रग पेडलर NCB च्या हाती लागले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांचे नाव हारीश खान व शाकिब खान असून ते दोघेही भाऊ आहेत असे समोर आले आहे. तर एनसीबीने या दोघांनाही वांद्रेमधून अटक केली आहे. दरम्यान तपासात शाकिबवर १९ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. शाकीब आणि हारीश दोघांनाही सध्या एनसीबीने वांद्रे पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. इथून या प्रकरणातील तपासाचा वेग आणखीच वाढीस लागल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने २८ मे रोजी सुशांत सिंग राजपूतचा रूम पार्टनर आणि अगदी खास जवळचा मित्र सिद्धार्थ पीठानी यालाही हैदराबादमधून अटक केली होती. त्यानंतर एनसीबीने नीरज आणि केशव जे सुशांतचे नोकर होते त्यांचीदेखील अगदी कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान हरीश खानचे नाव समोर आले. हारीश खान हा तोच ड्रग पेडलर आहे, ज्याच्याकडून सुशांतपर्यंत ड्रग्ज पोहचवले जात होते. तसे पाहता सिद्धार्थच्या अटकेनंतर एनसीबीने नीरज आणि केशव या दोघांची चौकशी सुरू केली आणि या प्रकरणी नवे खुलासे होऊ लागले आहेत. अर्थात NCB ची हि कारवाई यशस्वी असून लवकरच या प्रकरणाचे सर्व धागे दोरे हाती लागतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.

माहितीनुसार, हारीश त्याचा भाऊ शाकिब खानसोबत वांद्रे परिसरात ड्रग्सचा मोठ्या प्रमाणात व्यापार करत होता. हारीशला दाऊद बनायचे होते. दाऊद त्याचा प्रेरणास्त्रोत असून त्याला मुंबईवर त्याच्याचसारखं अधिराज्य गाजवायचे होते. आपली दहशत कायम ठेवण्यासाठी हारिश वांद्रे परिसरातील छोट्या ड्रग पेडलरचे अपहरण करायचा आणि त्यांच्याकडे असलेले ड्रग्स जप्त करुन त्यांना आपल्या टोळीमध्ये काम करण्यास जबरदस्ती भाग पाडायचा. लोकांमध्ये आपली दहशत निर्माण करण्यासाठी हारीश खान कधी बंदूक घेऊन फिरायचा तर कधी जिवंत साप घेऊन. असा हा विकृत आणि चालबाज हारीश खान त्याचा साथीदार अर्थात त्याचा भाऊ शाकिब खानसोबत अखेर पोलिसांच्या हाती लागलाच. एनसीबीचा तपास सध्या युद्धपातळीवर सुरु असून लवकरच यात अजून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.