Thursday, February 2, 2023

रोहित पवारांचे कट्टर विरोधक राम शिंदेंसोबत अजित पवारांची गुप्त बैठक; चर्चांना उधाण

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप माजी मंत्री आणि रोहित पवारांचे कट्टर विरोधक असलेले राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. पण साखर कारखान्यावरच चर्चा करायची असेल तर भेटीबाबत गुप्तता का? असा सवालही चर्चिला जातोय.

अंबालिका साखर कारखाना हा कर्जत जामखेड मतदारसंघात येतो.  अजित पवार नेहमी या कारखान्यावर येत असतात. याच मतदारसंघातून रोहित पवार हे राम शिंदे यांना पराभूत करून आमदार झाले आहेत. शनिवारी सकाळी पवार या कारखान्यावर असताना शिंदे तेथे आले. दोघांची गोपनीय बैठक झाली.

- Advertisement -

काही प्रत्यक्षदर्शींनी या भेटीस दुजोरा दिला. शिंदे हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात, असे असताना त्यांनी पवार यांची भेट का घेतली, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र राष्ट्रवादीच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने खासगीत बोलताना ही केवळ सदिच्छा भेट आहे, असे सांगितले.

कोण आहेत राम शिंदे?

राम शिंदे हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील मंत्री होते. पण राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी कर्जत जामखेड मध्ये एन्ट्री केली आणि त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघात राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशी लढत झाली होती. यामध्ये रोहित पवार यांचा दमदार विजय झाला होता.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.