एकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेश करणार का ?? अजितदादांनी हातच जोडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे जेष्ठ नेते  एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे. एकनाथ खडसेना महाविकास आघाडी सरकार मध्ये मंत्रिपद मिळणार अशीही चर्चा रंगू लागली . परंतु खडसेंनी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला नसून वेळ आल्यावर बघू, वाट बघा अस उत्तर प्रसारमाध्यमाना दिले.  यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी चक्का हात जोडून पत्रकारांना नमस्कार केला. तसेच, नेहमीप्रमाणे याबद्दल आपणास काहीच माहिती नसल्याचे पवार म्हणाले.

एकनाथ खडसेंनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. त्यामुळे खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशातील चर्चांना आणखी उधाण आले आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर हत्याकांड प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख रावेरमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी रावेर येथील विश्रामगृहात अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे यांची भेट झाली. ही भेट कोणत्या कारणसाठी झाली. याबाबत पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली. विशेष म्हणजे, विश्रामगृहावरून अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे एकाच गाडीने घटनास्थळी निघाले. त्यामुळे पुन्हा एकनाथ खडसेंच्या पक्षांतराबाबत तर्क-वितर्क सुरु झाले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर दौऱ्यावर असून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते पाहणी करणार आहेत. तत्पूर्वी, पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांना एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, अजित पवारांनी चक्क हात जोडले. तसेच, मला याबद्दल काहीही माहिती नाही. ज्या गोष्टीची मला माहितीच नाही, त्याबद्दल मी तुम्हाला कसं काय सांगणार? असा प्रतिप्रश्नही अजित पवार यांनी केला. त्यामुळे, पत्रकारांमध्ये हशा पिकला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment