आता सांगा पाहू दबंग कोण? मिटकरींने मांडले मताधिक्याचे गणित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते असून 100 अजित पवारांना खिशात घेऊन फिरतात असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या मताधिक्याची आकडेवारी मांडत खरा दबंग कोण असा सवाल केला.

चंद्रकांत पाटील दबंग कोण या प्रश्नाचे उत्तर हे आहे. कोथरूडमध्ये तुम्हाला मिळालेली लीड 25, 495 मिळाली. तुमचे दबंग नेते देवेंद्रजी यांना मिळालेली एकूण लीड 49,482. म्हणजे चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची मिळून लीड ही 74 हजार 977 होते. आता बारामतीत तुमच्या पक्षाचे डिपॉझिट जप्त करून अजितदादांना मिळालेली 1,65,265 लीड मिळाली. आता सांगा पाहू दबंग कोण?, असं ट्विट अमोल मिटकरींनी केलं आहे.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते-

महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की, गृह खाते राष्ट्रवादीच्या वाट्याला देऊ नका, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पाटलांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत शपथ घेतली तेव्हा तुम्ही हा सल्ला फडणवीसांना दिला होता का? असा प्रश्न पत्रकारांनी केला. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ‘देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका म्हंटल.

Leave a Comment