अरे तुमच्यापेक्षा सैतान परवडले ; खतांच्या दरवाढीवरून मिटकरींचा केंद्रावर घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांनी शेतमशागतीची कामे सुरू केली आहेत. पण अशातच खताची दरवाढ ६० टक्के झाली आहे. खताचे बाजारभाव खत कंपन्यांनी भरमसाठ वाढविल्यामुळे शेतकरी वर्ग अस्वस्थ झाला आहे. यावरून केंद्रातील मोदी सरकार वर विरोधकांनी निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्र सरकारवर कडक शब्दांत हल्लाबोल केला आहे.

एकीकडे शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रु टाकुन केंद्रसरकार शेतकऱ्यांचा कैवारी असे चित्र उभे करायचे तर दुसरीकडे खताचे भाव वाढवून दुपटीने शेतकऱ्यांना लुटायचे. अरे तुमच्यापेक्षा सैतान परवडले! शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सैतानानो नरकात सुद्धा जागा मिळणार नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खतांच्या दरवाढीचा निषेध म्हणून याविरोधात राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन हाती घेणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले. या दरवाढीविरोधात देशभरातील इतर शेतकरी देखील मोठ्या संख्येने केंद्र सरकारविरोधात आवाज उचलतील, अशी आशाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment