पडळकर आणि सदाभाऊ खोत म्हणजे भाजपनियुक्त चंगु आणि मंगू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर सातत्याने टीका करणारे सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे भाजप नियुक्त चंगु – मंगु आहेत अशी बोचरी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही नेते शरद पवारांवर टीका करत आहेत त्याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीने पलटवार केला आहे.

अनिता भामरे म्हणाल्या, भाजपची राज्यात सत्ता नसल्याने नेते सैरभैर झाले आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करण्यासाठी कोणीतरी अक्कल शून्य माणसाची गरज ओळखून भाजपने पार्टी विथ डिफरन्स या नावाखाली गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली. या दोघांना फक्त शरद पवार आणि अजित पवार हेच दिसतात.

खरे तर विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे, तिथे विद्यमान लोकांना आपल्या क्षेत्रातील विद्यमान लोकांना नियुक्त करण्याची प्रथा आहे. पण भाजपाकडे कोणते लोक आहेत, त्यांची क्षमता काय आणि त्यांचे काम काय? हे त्यांच्या नियुक्तीवरून दिसून येते. जास्त शिकलेले लोकप्रतिनिधी नसल्याने रिक्त पदे भरण्यासाठी कमी पात्रता असलेल्यांची गरज लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली की काय, अशी शंका येते.

भाजपचे सर्वेसर्वा असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देखील शरद पवार साहेबांवर टीका करत नाहीत परंतू हे दोन अक्कल शून्य चंगुमंगू सातत्याने पवार कुटुंबांवर टीका करतात. काल सोलापुरात सदाभाऊ खोत शरद पवार साहेबांचे पवार आडनाव बदलून ‘आगलावे’ करावे असे म्हणाले. सदाभाऊ साहेबांचे वय, काम बघून तरी त्यांच्यावर टीका करायची साहेब आगलावे नक्कीच नाही मात्र त्यांनी ठरवले तर तुमच्या सारख्या भस्मासुराला ते नक्कीच भस्म करू शकतील एव्हढे लक्षात ठेवा असे अनिता भामरे म्हणाल्या.

Leave a Comment