गोवा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून 24 स्टार प्रचारकांची यादी जाहीर; प्रचारासाठी जाणार ‘हे’ नेते 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीमुले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भाजप विरोधात प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 24 स्टार प्रचारकांची यादी आज दिल्ली कार्यालयातून जाहीर केली. या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 24 स्टार प्रचारकांची निवड केली आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनेही जोरदार तयारी केली आहे. नुकतेच भाजप केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गोव्याचा दौरा केला. तर त्याच्यानंतर काँग्रेसच्यावतीनेही काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोव्यात जाऊन निवडणुकीची व तेथील परिस्थिती माहिती घेतली. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना यांच्यात युती होऊ शकली नाही, परंतु आमची मैत्री कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे हे नेते असणार स्टार प्रचारक

1). शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
2). प्रफुल पटेल, माजी खासदार
3). सुनिल तटकरे, खासदार
4). सुप्रिया सुळे, खासदार
5). अजित पवार, उपमुख्यमंत्री
6). दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री
7). जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री
8). जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री
9). नवाब मलिक, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री
10). धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री
11). हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री
12). ए. के. ससिनद्रन, केरळचे वनमंत्री
13). नरेंद्र वर्मा, राष्ट्रीय प्रवक्ते
14). फौजिया खान, खासदार
15). धीरज शर्मा, युवक राष्ट्रीय अध्यक्ष
16). सोनिया दुहन, विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्षा
17). शब्बीर विद्रोही, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष
18). जोसे फिलीप डिसोजा, गोवा अध्यक्ष
19). डॉ. प्रफुल हेडे
20). अविनाश भोसले
21). सतिश नारायणी (गोवा),
22). पी. सी. चोको, केरळचे अध्यक्ष
23). थॉमस के. थॉमस, केरळचे आमदार
24). क्लाईड क्रास्टो, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते

Leave a Comment