राष्ट्रवादीचे गाव तिथं सभा असे प्रचार धोरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
परभणी |प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकरांचा प्रचार घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी तालूकानिहाय पदाधिकारी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली . जिंतूरचे  राकाँ आमदार विजय भांबळे यांनी विधानसभा मतदारसंघातुन प्रचाराची धुरा सांभाळली असुन  मंळवारी दुपारपर्यंत सेलू तालुक्यात चार गावात प्रचार सभा घेण्यात आल्या.
सेलू तालुक्यातील गोंडगे पिंपरी, केमापुर, गोसावी पिंपळगाव येथे परभणी लोकसभा रा.काॅ.पार्टी,काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार  राजेशदादा विटेकर यांच्या प्रचारार्थ आमदार  विजय भांबळे  यांनी  जाहीर सभा घेतल्या.सर्व मतदारांना उमेदवार राजेशदादा विटेकर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याची आवाहन यावेळी करण्यात आले  . यावेळी प्रचार सभेला , जि.प.सभापती  अशोक नाना काकडे,जि.प.सदस्य  राजेंद्र काका लहाने, पं.स.सभापती  पुरुषोत्तम आण्णा पावडे,  सुधाकर रोकडे,पं.स.सदस्य  पप्पु गाडेकर, माऊली घुगे, काँग्रेस आय पक्षाचे विधानसभा अध्यक्ष राजेंद्र गाडेकर,  माणिक काजळे, सरपंच माऊली राठोड , विष्णू गुट्टे,  दिगंबर बुधवंत, उत्तमराव आघाव,  सुधीर आघाव , माऊली ताठे (तालुकाध्यक्ष रा.काॅ.पा.सेलू )व  रा.काॅ पा. व आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान परभणी लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे राजेश विटेकर आणि शिवसेनेचे संजय उर्फ बंडू जाधव यांच्यात निवडणुकीचा सामना रंगणार आहे. शिवसेनेचे संजय उर्फ बंडू जाधव हे शिवसेनेचे परभणी मतदारसंघाचे विद्यमान खासदार असून त्यांना यावेळी राष्ट्रवादीच्या तगड्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

Leave a Comment