हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या बंगल्यावर जाऊन भेट घेतली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्दावरून चर्चा करण्यासाठी भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण कसे टिकवायचे याबाबत चर्चा झाल्याचे समजत आहे
इम्पेरिकल डाटा केंद्राने द्यावा अशी मागणी राज्य सरकारची आहे. त्यासंदर्भात भुजबळ फडणवीसांना भेटले, तसंच सरकारला मदत करावी, अशी चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारकडे फडणवीस यांनी वजन वापरावे आणि हा डाटा महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती भुजबळ यांनी फडणवीस यांना भेटून केली.
यापूर्वी देखील ओबीसी आरक्षणा संदर्भात बोलताना भुजबळांनी म्हंटल होत की देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचं नेतृत्त्व करावं आणि पंतप्रधानांकडे जाऊन इम्पेरीकल डेटा मागावा.