ईडीचा उपयोग विरोधकांना दाबण्यासाठी होतोय ; छगन भुजबळ यांचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. तसेच ‘ईडी’ने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी ही नोटीस पाठवली जाणार असल्याचं खडसेंनी सांगितलं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी याप्रकरणावरून भाजपला टार्गेट केलं आहे.

छगन भुजबळ म्हणाले, एकनाथ खडसेंना नोटीस मिळणारच होती. ईडीचा उपयोग आपल्या विरोधकांना दाबण्यासाठी होतोय. जो विरोधात बोलेल त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होतो.असा आरोप त्यांनी केला.यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी लिहलेल्या अग्रलेखावर देखील भाष्य केले.

संजय राऊतांचा अग्रलेख उद्वेगामुळे लिहिलेला आहे. युपीए आणि बाहेरचे पक्ष एकत्र आले तर आजची परिस्थिती सुधारू शकते. ही वस्तुस्थिती आहे. एकत्र येऊन लढलं तर भाजपाला रोखणे शक्य आहे.ज्या राज्यात विरोधी पक्ष आहे, त्यांना पाठिंबा दिल्यास परिस्थिती बदलेल, असं छगन भुजबळ म्हणाले. राजकीयदृष्ट्या भाजपला जर प्रबळ आव्हान द्यायचं असेल तर विविध राज्यातील प्रमुख भाजपविरोधी पक्षांनी यूपीएमध्ये सामिल होऊन भाजपविरोधातली लढाई अधिक तीव्र करायला हवी”, असं छगन भुजबळ म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment