मी शिवसेना मोठी केली तेव्हा संजय राऊत खासदारही नव्हते; भुजबळांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिकला लाल दिवा आहे… उद्या नांदगावला लाल दिवा मिळू शकतो’, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांना नाशिक येथे जाऊन दिल्यानंतर भुजबळांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे शरद पवारांसारखेच या महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. त्यामुळे या शिल्पावर थोडेही ओरखडा देखील उमटणार नाही याची काळजी घ्यावी, अशी बोचरी टीका छगन भुजबळ यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

भुजबळ म्हणाले, नांदगावबद्दल राऊत काय बोलले हे माहिती नाही. कुठल्या आवाजात ते बोलतात, त्यावरून अर्थ बदलतात. पाहुणचार देवाणघेवाण होत असते. खरे तर संजय राऊत हे शरद पवारांसारखेच ‘मविआ’चे शिल्पकार. सुंदर शिल्प तयार झाले असेल, तर त्यावर ओरखडा उमटणार नाही याची काळजी खास करून शिल्पकाराने घ्यावी. शिवसेनेत मी तेव्हा राज्यात शाखा सुरू केल्या. त्यावेळी संजय राऊत नव्हते. सामनाच्या लॉचिंग वेळेचेही फोटो माझ्याकडे आहेत असे त्यांनी म्हंटल.

ते पुढे म्हणाले, नांदगाव मध्ये मी जे काम केलं ते संजय राऊत यांना माहित नसावं, कारण त्यांना गल्लीपासून दिल्ली पर्यंत कामं करावं लागतं. त्या मुळे मी त्यांना आमंत्रित करतो त्यांनी या मतदार संघात परत परत यावे. तसेच संजय राऊत यांनी नांदगाव मतदारसंघाबद्दल केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी बोलावं लागेल, असं भुजबळ म्हणाले.