विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत नवा ट्विस्ट?? पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन अन्…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यातील महाविकास आघाडी आणि राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले. आवाजी मतदानाला राज्यपालांनी विरोध केल्यानंतर राज्यपाल आणि महाविकास आघाडीमध्ये खडाजंगी झाली होती. त्यानंतर आता अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून काही कायदेशीर बाबींवर चर्चा केली. यानंतर निवडणूक न लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडी कडून घेण्यात आल्याचे समजत आहे.

महाविकास आघाडीतील नेत्यांनी कायदेशीर सल्ला घेतल्या नंतर निवडणूक न लढण्याची भूमिका घेतली. राज्यपालांचा विरोध पत्करून निवडणूक घेतल्यास घटनात्मक पेच निर्माण होईल. अस महाविकास आघाडीतील काही नेत्यांच मत आहे. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवटही लागू झाली असती त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे अशी माहिती समोर येत आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज होणार नाहीये. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी एक विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते किंवा राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही निवड होऊ शकते.

Leave a Comment