राज्यात सहा महिन्यात मध्यावधी निवडणुका होणार, शरद पवारांनी दिले संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसची (Sharad Pawar) वाय बी चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह सर्व दिग्गज नेते आणि पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर खलबतं झाली. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रि पदाची शपथ घेतल्यानंतर आजपासून या नव्या सरकारचं पहिलं दोन दिवसीय अधिवेशन भरवण्यात येणार आहे. या अधिवेशनात सरकारची उद्या बहुमत चाचणी होणार आहे. या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवरच ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या आमदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यापैकी सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे हे सरकार सहा महिने टिकणार आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा अशी सूचना शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या आमदारांना दिली आहे. नुकतीच विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव झाला. या निवडणुकीनंतर आता उद्या विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारची फ्लोर टेस्ट होणार आहे. यामध्ये शिंदे सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शरद पवार काय म्हणाले ?
“महाराष्ट्रातील नवं सरकार, शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकांसाठी तयार राहा”, अशी सूचना शरद पवार (Sharad Pawar) यांनी सर्व आमदारांना केली आहे. “आपण राष्ट्रवादी काँग्रेस सध्या विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ द्या”, अशी महत्त्वाची सूचना पवारांनी (Sharad Pawar) आपल्या आमदारांना केली आहे. तसेच शिंदे सरकारमध्ये ज्या आमदारांना मंत्रिपदाची महत्त्वकांक्षा आहे आणि त्यांना मंत्रिपद मिळालं नाही तर पुन्हा ते काही दिवसांत स्वगृही परतण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नव्याने स्थापन झालेलं सरकार पुढच्या काही महिन्यांमध्ये सहज कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार पडलं तर मध्यावधी निवडणुका लागतील. त्यामुळे तयारी आत्तापासून करायला लागा अशी महत्वाची सूचना शरद पवार यांनी आपल्या आमदारांना दिली आहे.

हे पण वाचा :
Share Market ची वाटचाल पुढील आठवड्यात कशी असेल ???

Toyota ची Urbun Cruiser Hyryder लॉन्च; सेल्फ चार्जिंगचे दमदार फीचर्स

Yes Bank चे कर्ज महागले, बँकेकडून MCLR मध्ये करण्यात आली वाढ !!!

साताऱ्यात भरदिवसा डोक्यात गोळी घालून खून : आरोपी फरार

गेल्या आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

Leave a Comment