गणपतरावांच्या निधनामुळे जनसामान्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता आपण गमावला- शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात जेष्ठ नेते आणि तब्बल ११ वेळा आमदारकी भूषवलेले सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी काल वयाच्या ९४ व्य वर्षी आपला अखेरचा श्वास घेतला. गणपतराव यांच्या निधनानंतर राज्यभरातून दिग्गज नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देत गणपतरावांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान गणपतराव यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता आज आपण गमावला आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली

शरद पवार यांनी ट्विट करत म्हंटल की , कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल

लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे. असे म्हणत शरद पवारांनी श्रद्धांजली वाहिली

Leave a Comment