पालघर घटनेचं कोणीही राजकारण करू नका; शरद पवारांनी दिला विरोधकांना दम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पालघरमध्ये झालेलं हत्यांकांड अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. अशी घटना घडायला नको होती. या घटनेचा आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही. काही लोक आता या घटनेचं राजकारण करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचं चित्रं निर्माण केलं जात असून हे चुकीचं आहे, असं सांगतानाच सध्याच्या परिस्थितीत नकारात्मकता कमी करणं आवश्यक आहे. तसेच पालघरच्या घटनेचं राजकारण करू नका, राजकारण नंतरही करता येईल. आता कोरोनाच्या संकटाविरोधात एकजुटीने लढू या, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या. शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा फेसबुकद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

“पालघरला जे झालं त्याचा जो काही संबंध असेल तर त्याची चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या प्रकरणातील काही लोकांना अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर काही तासांमध्ये राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनानं याची दखल घेतली. अशी प्रकरणं घडायला नको. ते निषेधार्ह आहे. पालघर प्रकरण आणि कोरोनाचा कोणताही संबंध नाही. या प्रकरणाचं कोणीही राजकारण करू नये,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई, पुण्यात लॉकडाउनच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करा. लॉकडाउनमुळे देश आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती बरी पण समाधानकारक नाही. असही शरद पवार यांनी म्हटलं.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”

Leave a Comment