सोलापूर प्रतिनिधी | पंढरपूर विधानसभा मतदार संघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी या आघाडीतील दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे पंढरपुरातील आघाडीतला हा घोळ आता चांगलाच चर्चेचा विषया झाला आहे.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे असलेले आमदार भारत भालके यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून काँग्रेसच्या वाट्याला असलेली पंढरपुरची जागा राष्ट्रवादीकडे घेतली मात्र अशातच काल रात्री काँग्रेसच्या जाहीर झालेल्या यादीत पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव काळुंगे यांना उमेदवारी दिली आहे यामुळे अख्या महाराष्ट्र मध्ये फक्त पंढरपुरामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेका विरुद्ध लढणार काय अशी परिस्थिती झाली आहे
आज भारत भालके यांनी आपल्या कार्यकर्त्यां मार्फत राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला तर शिवाजी काळुंगे यांनी सुद्धा काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. काळुंगे आणि भालके एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असल्याने आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आघाडीतून कोण निवडणूक लढणार हे थोड्यात दिवसात स्पष्ट होईल. दरम्यान गेली 30 वर्षे काॅग्रेसचे काम करत आहे माझे काम पाहूनच मला पक्षाने उमेदवारी दिल्याचे काॅग्रेसचे उमेदवार शिवाजी काळुंगे यांनी सांगितले तर या प्रश्नावर आमदार भारत भालके यांनी बोलण्यास नकार दिला.