मी माझी भूमिका मांडलीय, आता निर्णय पक्ष आणि पवारसाहेब घेतील – धनंजय मुंडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. दरम्यान, धनंजय मुंडे पक्ष नुकतंच राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले आहेत. पक्ष कार्यालयात अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातील बैठक पार पडल्यानंतर धनंजय मुंडे पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी आरोपांनंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, “मी शरद पवारांकडे स्पष्टीकरण दिलं आहे. बुधवारी सकाळीच मी त्यांना भेटलो. माझं व्यक्तीगत जे म्हणणं आहे ते प्रेसनोटच्या माध्यमातून प्रसारमाध्यांना दिलं आहे”. धनंजय मुंडे यांना राजीनाम्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “याबाबत शरद पवार आणि पक्षातील मोठे नेते निर्णय घेतील

धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर – शरद पवार

दरम्यान ,धनंजय मुंडे  यांच्यावरील बलात्काराचे आरोप हे गंभीर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला एक पक्ष म्हणून याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. याप्रकरणात कोर्ट आणि पोलीस काय कारवाई करायची ती करतील. पण पक्ष धनंजय मुंडे यांच्याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like