Wednesday, February 1, 2023

सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही, मनात प्रामाणिकपणा असावा; धनंजय मुंडेंचा संभाजीराजेंना टोला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मला प्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा, असं वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. संभाजीराजे यांना खरंच मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का असाही प्रश्न पडला. अशातच आता संभाजीराजे छत्रपती यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत संभाजीराजेंना टोला लगावला आहे.

धनंजय मुंडे यांनी परळीत मीडियाशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले, सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही, चळवळ चांगली केली तर चळवळीतील प्रश्नांना यश येतं. त्यामुळं मनातील प्रामाणिकपणा असावा, पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये, असं धनंजय मुंडे म्हणाले.

- Advertisement -

संभाजीराजे नेमकं काय म्हणाले –

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तुम्हाला मला जाब विचारायचा असेल तर आधी मला मुख्यंमंत्रीपदावर बसवा, असे वक्तव्य खासदार संभाजी छत्रपती यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. मात्र, यानिमित्ताने संभाजीराजे यांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची इच्छा ओठावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.