राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन कोटींची मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाविषाणूने अक्षरशः धुमाकूळ घातला असून संकट वाढलं आहे. सरकार कडून कोरोना विरोधातील लढाई जोरदार सुरू असून ही लढाई अजून बळकट होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक मदत जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक आपत्तीत महाराष्ट्रातील जनतेच्या सोबत राहिला आहे आणि त्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्यास कटिबद्ध आहे. म्हणूनच कोरोना विरूद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट तर्फे एक कोटी तर पक्षाच्या राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आले.

राज्यातील प्रशासन व जनता कोरोनाच्या या अभूतपूर्व संकटासोबत जोमाने लढा देत आहे. पण एकूणच जगभराचा आर्थिक विकास मंदावला असल्याने राज्याच्या तिजोरीवर ताण पडत आहे. राज्यातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला असल्याने राज्याच्या तिजोरीवरचा भार अधिक वाढणार आहे. त्यामुळे या संकटकाळात आपली सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मदतीसाठी पुढे सरसावला आहे.

दरम्यान, यापूर्वी काँग्रेसनेही कोरोना विरोधातील लढ्यात मदतीसाठी पुढाकार घेत राज्यातील सर्व काँग्रेस आमदारांचे १ महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचं जाहीर केले होते. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून ५ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिली जाणार असल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment