‘मी पुन्हा येईन’ चा उल्लेख करत खडसेंचा फडणवीसांना जोरदार टोला, म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद काही नवा नाही. फडणवीसांवर नाराज होऊन खडसेंनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. त्यानंतर एकमेकांनावर आरोप-प्रत्यारोप चालूच आहेत. आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी मी पुन्हा येईन चा उल्लेख करत फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटलांच्या संवाद यात्रेसाठी जळगावात घेतलेल्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना खडसेंनी भाजप आणि फडणवीसांना टोमणा मारला. कार्यकर्त्यांना थोपवून धरण्यासाठी आपलं सरकार येणार आहे, असं विरोधक सांगत राहतात, मात्र महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार आणि यांना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईनच करत बसावं लागणार, अशा शब्दात  एकनाथ खडसे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

महाविकास आघाडी सरकार टिकणार”

दरम्यान, राज्याचं राजकारण बदलत आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आता पाय रोवत आहे. समोरच्यांना कितीही वाटत असेल, हे सरकार पडणार आहे, हे सरकार जाणार आहे, तरी हे सरकार टिकणार आहे, सरकार चालणार आहे. असं एकनाथ खडसे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like