फडणवीसांनी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये ; खडसेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना चा उद्रेक होत असून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. दरम्यान राज्यावर मोठं संकट आलं असताना सत्ताधारी आणि विरोधक हे सुद्धा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये असं ते म्हणाले आहेत. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्र राज्याची परंपराच राहिलेली आहे की, ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावर संकट आले जसे की किल्लारीचा भूकंप, मुंबईमध्ये झालेला २६/११ चा हल्ला किंवा रेल्वेमध्ये झालेले १६ बॉम्बस्फोट….अशा अनेक प्रसंगाच्या वेळेस राजकारण बाजूला सोडून विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांनी हातात हात घालून कामं केली.

त्या कालखंडामध्ये मी विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्षनेता होतो. पण अशा संकटामध्ये कुत्र्या मांजराचा खेळ आम्ही खेळलो नाही. देवेंद्र फडणवीस जे करत आहेत ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like