पडळकरांचे बोलवते धनी हे देवेंद्र फडणवीसच – हसन मुश्रीफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते गोपीचंद पडळकर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. या टीकेला राष्ट्रवादी कडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही पडळकर यांच्यावर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोख धरला.

मुश्रीफ म्हणाले, पडळकर आणि खोत यांची लायकी काय? लायकी नसताना त्यांनी पवारांसारख्या नेत्यावर बोलू नये. लायकी नसलेली माणसंच सध्या जास्त बोलत आहेत. त्यांचा बोलविता धनी हे फडणवीसच आहेत. सत्ता नसल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. म्हणूनच केवळ बदनाम करण्यासाठी आरोप केले जात आहेत.

सत्ता गेल्याचे दु:ख फडणवीस यांच्या चेहऱ्यावर क्षणोक्षणी जाणवत असल्याचा आरोप करताना मुश्रीफ म्हणाले, हे आरोप थांबवले नाहीत तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. कोणावरही टीका करताना त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like