राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी रामराजे व एकनाथ खडसेंना उमेदवारी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर लगेच विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणुक होत आहे. त्यामुळे उमा निवडणुकीत कोणता उमेदवार उभा करायचा? याची तयारी मोठ्या पक्षांकडून केली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

विधानपरिषदेच्या 20 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची नावे निश्चित करण्यात आलेली आहेत. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी कडूनही दोन दिग्गज नेत्यांचानावाचा उमेदवारीसाठी विचार केला जात आहे. ते म्हणजे एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर होय. एकनाथ खडसे यांनी अनेकवर्ष भाजपसाठी काम केले.

पण भाजपमधील अंतर्गत मतभेदामुळे पुढे खडसे भाजपमधून बाहेर पडले. खडसे त्यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून दोन दशक आमदार म्हणून निवडून आले. ते राज्याचे महसूल मंत्री होते. त्यांना 2019 च्या निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

विधान परिषदेचे सभापती असलेले रामराजे नाईक निंबाळकर हे फलटणच्या राजघराण्याचे 29 वे वंशज होय. 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी रामराजेंनी राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते महसूल राज्यमंत्री झाले. 2004 मध्ये ते कॅबिनेट मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री झाले.

2013 मध्ये ते राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष झाले. मतदारसंघांच्या पुनर्रचनेत फलटण मतदारसंघ आरक्षित झाला. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. सध्या ते विधान परिषदेचे सभापती आहेत. आता राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी रामराजेंनाही संधी देण्याचा विचार केला जात आहे.

खडसे आणि रामराजेंनी घेतली पवारांची भेट

विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी आज सकाळी रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या एकनाथ खडसेंना गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय पुनर्वसनाची अपेक्षा आहे. तर जवळचे असणाऱ्या रामराजेंनाही विधानपरिषदेवर जाण्याची इच्छा या भेटीमुळे दिसत आहे.

Leave a Comment