शुगर- बीपीचा त्रास नको म्हणून गृहखाते नाकारलं- जयंत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गृहमंत्रीपद नाकारलं, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. यावर आता जयंत पाटील भाष्य करताना डायबिटीस आणि बीपीचा त्रास नको म्हणून मी गृहमंत्री पद नाकारलं अशी कबुली दिली. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी जयंत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी आर आर पाटील यांच्यासोबत झालेला एक किस्साही सांगितला.

जयंत पाटील म्हणाले, 2009 मध्ये गृहखाते घेण्याआधी एका लग्नाकार्यात आर आर आणि मी दोघे गेलो होतो. त्यावेळी आपण आबांना विचारले, गृहखाते कसं असतं? त्यावेळी आबांना मला विचारले की ? तुम्हाला ब्लड प्रेशर किंवा शुगर आहे का? मी आबांना सांगितलं, मला अजिबात त्रास नाही. त्यावर आबा म्हणाले गृहखाते घ्या, तुम्हाला दोन्ही गोष्टी सुरू होतील.आणि गृहमंत्री झाल्यानंतर आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास सुरु झाला,आपल्या खासगी सचिवालाही ब्लड प्रेशर सुरू झाले, इतके तणावपूर्ण काम असते, त्यामुळे तेव्हापासून माझं मत आहे, की आता ब्लड प्रेशर सुरू झाले आहे, शुगर मागे लावून घ्यायचा नाही,अ शी आपली भूमिका आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले-

अजित पवार म्हणाले की, दिलीप वळसे पाटलांकडे आज गृहमंत्री पद आहे. फार बारकाईने, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं. कायदा सुव्यवस्था कशी योग्य राहील. कोणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. मागे आर आर आबा, छगन भुजबळ मग जयंत पाटील यांनी एक वर्ष गृहमंत्री पद सांभाळलं. मी यावेळी जयंतरावांना म्हटलं की तुम्ही एकच वर्ष गृहमंत्री पदी होता, आता यावेळी परत घ्या ना. पण जयंत राव म्हणाले, नाही… ते म्हणाले गृहखाते घेतल्यावर माझा बीपी वाढेल. मला गोळ्या सुरू झाल्या. मला नको गृह विभाग

Leave a Comment