हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता हि भेट झाली असून दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याचे समजत आहे. या चर्चेनंतर राजकीय तर्क वितर्कांनां उधाण आलं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या भेटीचं नेमकं कारण सांगितलं आहे.
देशातील नागरी बँका आणि सहकारी बँकांवर निर्बंध आणण्याचं काम रिझर्व्ह बँकेनं केलं आहे. ते बंधन करणी करावेत यासाठी शरद पवार दिल्लीत भेटीला गेल्याचं जयंत पाटील यांनी म्हंटल. “देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रातल्या लोकांनी गेल्या महिन्या-दीड महिन्यात अनेक पत्र पाठवली. त्या सगळ्यांचा विचार करून केंद्र सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत, यासाठी शरद पवार त्यांना भेटायला गेले”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
पवार- फडणवीस भेट ??
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र, मोदींना भेटण्यापूर्वी पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट झाल्याचं समोर यर्त आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दोन्ही नेत्यांनी दिल्लीत भेट घेऊन चर्चा केल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.