नवाब मलिकांचे वानखेडेंवर गंभीर आरोप, जयंत पाटील म्हणतात या प्रकरणी योग्य ती पावले टाकली जातील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणाला आता वेगळंच वळण लागले आहे. Ncb अधिकारी समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी खोटी कागदपत्रे दाखवून नोकरी मिळवली असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. तसेच त्यांनी ट्विट करत वानखेडे यांचे जन्म प्रमाणपत्र उघड केलं. त्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रकारणावर भाष्य करत एकंदर हे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणी योग्य ती पावले टाकली जातील,’ असे संकेत दिले

जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा पूर्ण प्रयत्न भाजपकडून करून झाला आहे. पण हे सरकार पडत नाही असं दिसल्यावर सरकार व मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आर्यन खान हे प्रकरण त्याचाच भाग आहे. आर्यन खान प्रकरण बोगस असल्याचं नवाब मलिक यांनी पुराव्यासह उघड केलं आहे. आज समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला त्यांनी प्रसिद्ध केलाय. त्यावरून समीर वानखेडे यांनी मागासवर्गीय असल्याचं दाखवून फायदा मिळवला असल्याचं दिसत आहे,’ असंही पाटील म्हणाले.

समीर वानखेडे यांचे जन्मप्रमाणपत्र नवाब मलिक यांनी प्रसारीत केले आहे. त्यावरून समीर वानखेडे यांनी मागासवर्गीय असल्याचे दाखवून फायदा मिळवला असल्याचे दिसत आहे. प्रभाकर साहील याने एनसीबी व समीर वानखेडे यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, हे सर्व धक्कादायक आहे. मुंबईतील बॉलिवूड आणि महाराष्ट्र बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. ईडी, सीबीआय, आयटी या यंत्रणा कमी पडल्यामुळे आता एनसीबी ॲक्टीव झालेली दिसते, असा खोचक टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

You might also like