हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेचे पडसाद महाराष्ट्र राज्यात मात्र, चांगलेच उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक देत आंदोलन केले. त्यातून भाजप व मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. “भाजपला सत्येची मग्रुरी आणि सत्तेचा माज दिसतोय. यांच्या लेखी शेतकऱ्यांचं किंमत काय हेच यातून दिसून येतं”, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
महाराष्ट्र बंदवरून भाजपवर टीका करताना आव्हाड म्हणाले की, “लखीमपूर खेरी येथील घडलेल्या घटनेच व अमानवीय कृत्याचं दु:ख होणं हे माणुसकीचं दर्शन आहे. या ठिकाणी पाहिलं तर भाजपला सत्येची मग्रुरी आणि सत्तेचा माज आलेला दिसतोय. गोरगरीब शेतकरी रस्त्यावर उभे आहेत. मागणं येणारी जीप त्यांच्या अंगावर घालायची. त्यांना चिरडून मारुन टाकायचं. त्यांच्याबद्दल वाईट वाटणारच असेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.
शेतकरी कुठलाही असो शेवटी या देशाचा शेतकरी आहे ना? असा सवाल करीत आव्हाड म्हणाले की, उत्तर प्रदेशात ज्या भागात ही घटना घडली त्या भागात सर्वात जास्त गहू पिकतो. तुमच्या घरामध्ये पोळ्या आहेत त्या तिथल्या वावरातून आल्या आहेत. खाताना बरोबर वाटतं ना? तुमच्या लेखी शेतकऱ्यांचं किंमत काय हेच यातून दिसून येत आहे, असे आव्हाड यांनी म्हंटले आहे.